सांग ना काय लपवतेस !
प्रिये एव्हढी हसतेस
म्हणजे नक्कीच फसवतेस
सांग ना काय लपवतेस ?
दु:ख हुदयातच ठेवतेस
चेहऱ्यावर आनंद आणतेस
सांग ना काय लपवतेस ?
डोळ्यांत करूणा जपतेस
ओठांवर हास्य दाखवतेस
सांग ना काय लपवतेस ?
आठवून आठवून बोलतेस
उगाचच मधेच थांबतेस
सांग ना काय लपवतेस ?
एकटीच एरझाऱ्या घालतेस
स्वतःशीच काही पुटपुटतेस
सांग ना काय लपवतेस ?
लिहायचा प्रयत्न करतेस
कागद सतत फाडतेस
सांग ना काय लपवतेस ?
माझ्याशी बोलणे टाळतेस
नजर माझी चुकवतेस
सांग ना काय लपवतेस ?
राग माझा दडवतेस
की दुःख स्व:ताचे झाकतेस
सांग ना काय लपवतेस ?
प्रशांत कदम,
०३-०८-२०१७.
९५९४५७२५५५.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment