आला रे आला
अवखळ रिमझिम
पाऊस आला
चराचराला
भिजवीत सुटला
चिंबचिंब
सृष्टी भिजली
हरिततृणांची
झालर रूजली
डोंगरदऱ्यांतही
झरे प्रसवले
भरभरून पाणी
वाहू लागले
हिरव्या हिरव्या
गर्द शिवारी
नाले ओथंबले
लाल सोनेरी
थेंवाथेबांची
किमया मोठी
पानापानांवर
झळाळले मोती
ईंद्रधनुचे
रंग ऊधळले
नभोमंडपी
तोरण सजले
वीजा वाऱ्यासवे
कडाडल्या
उन पावसाच्या
खेळात रंगल्या
आला रे आला
पाऊस आला
सर्वत्र आनंद
घेऊन आला !!
प्रशांत कदम
०६-०७-२०१६.
९५९४५७२५५५.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment