Saturday, June 1, 2019

विसरू जगाला !


विसरू जगाला

वेडापिसा माझा जीव होई
विरहात तुझ्या असताना
मात्र तुझ्याशी बोलतांना
परमानंद होई मनाला

सतत तूला पहात रहावे
काही बाही बोलत बसावे
भाव मुद्रा तुझ्या पहाव्या
छंदच हा जडला मनाला

तुझ्या लाघवी या स्वरांचे
बोल माझ्या कानी पडावे
मोहक त्या नजरेने तुझ्या
घायाळ करावे ह्या जीवाला

सतत तुझा स्पर्श व्हावा
श्वासांतील तव मंद हवा 
सहवासातलाच गंध हा
ऊरी स्वप्नी मज भासला

मोकळ्या केसांत खरोखरी
फुलां प्रमाणे मी फुलावे 
मलमली तारुण्यात सखे
रंगूनी विसरावे जगाला !

ध्यास एकच तुझा प्रिये
निरर्थक बाकी सर्व वाटे
मिलनाचेच ते दिवा स्वप्न
ऊराशी धरले जगायला !!

प्रशांत कदम,
२५ - ०६ - २०१६.





Sent from my iPhone

No comments:

Post a Comment