केवळ तूझ्या स्पर्शात
Sent from my iPhone
ही अवखळ जादू आहे
दुख: हरूनी दूर पळाले
मन प्रसन्न सहज झाले
सरली हूरहूर मनातली
सूखद आठवण भासली
हेच का ते प्रेम आपले
हवे हवेसे मज वाटले
निरामय हास्य तूझे
ओठांवरी तव पसरले
गुलाबी,शुभ्र रंग सजले
मोत्या परी मज भासले
गालात हासरी कुंदकळी
जणू तरंग ते पाण्यावरले
परत परत ते लाजलेले
गुलाबच दिसती मोहरलेले
तेज तरार कटाक्ष तूझा
घायाळ करी मनाला
मिळताच नजर नजरेला
कलेजा खलास झाला
जादू तूझ्या स्पर्शाची
देई गारवा मनाला
एकरूप होता मिळे
परम आनंद जीवाला
प्रशांत कदम
१५ - ०४ - २०१४,
९५९४५७२५५५,
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment