येईल का बळ ?
Sent from my iPhone
देवास ठावूक
जायचे कुठे ?
आम्ही निघालो
वाट फुटेल तिथे
पर्यायच नव्हता
करणार काय ?
मार्गच सापडेना
खोलात पाय
प्रयत्न देखील
केले खूप
देवासही लावले
अगरबत्ती धूप
पदरी पडले
निराशेचे फळ
येणार कुठून
शरीरात बळ
निसर्ग चांगलाच
होता कोपला
पाऊस पाणी
येतां येतां थांबला
काळी आई
राहिली कोरडी
बी बियाण्याची
रिकामी परडी
डोळ्यां पुढती
फक्त अंधार
त्यात ही दिसती
सावकारच चार
मनास सलते
सावकारी ऋण
काळोखात गेला
दिवाळीचा सण
पोरा बाळांची
रोज उपासमार
कुटुंब सगळं
भूईला भार
देणेकऱ्यांचे
सतत तगादे
खायचे काय
त्याचे ही वांदे
शेवटी मग
केला निश्चय
घर सोडले
नभाचा आश्रय
आम्ही निघालो
वाट फुटेल तिथे
देवास ठावूक
जायचे कुठे ?
कुणी म्हणेल
काढला पळ
अशक्त पंखाना
येइल का बळ ?
प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२३-०२-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment