या मेघांनो !!
या मेघांनो, भर भरून जरा
आल्हाद समवेत फुलवून धरा
असेच या, गगनी असेच फिरा
धरतीस ह्या मंत्र मुग्ध करा
मेघ दाटले, काळोख पसरला
पर्ण फुलांचा रंग मोहरला
अन अचानक, बहरुनी थिरकला
मोर ही, मयुरपंखांनी सजला
सुरू जाहले, नाद स्वर गगनी
लखलखल्या, वीजा ही नयनी
थंड वारे वाहती चहू दिशांनी
टप टपल्या जलधारा बरसूनी
रूप अवघे, सहज बदलले
डोंगर माथे, शीतल सजले
हरीततृणांनी, झूलू लागले
नदीनाले, खळखळूंन भरले
संतत धार ही, सूरु राहु दे
काळ्या आईला, चिंब होवू दे
मायेने अंकुर, तिला फुलवू दे
बळीराजाला आनंद, मिळू दे
या मेघांनो, भर भरून जरा
आल्हाद समवेत, फुलवून धरा
असेच या, गगनी असेच फिरा
धरतीस ह्या मंत्र मुग्ध करा
प्रशांत कदम,
१५-०२-२०१७.
९५९४५७२५५५.
No comments:
Post a Comment