Saturday, June 1, 2019

दोष हा कुणाचा ?


दोष हा कुणाचा ?

पावसाने जोर धरला
अन् सावीत्री नदी वरला
ब्रिटिश कालीन पुल
अचानक पूर्ण खचला

रात्रीच्या कुट्ट अंधारात
रस्त्यावर वेगात चाललेल्या
दोन एस टी गाड्या
वरून खाली पडल्या

गाड्यां मधील माणसे
नदीत वाहून मेली
एका क्षणात सर्वांची
स्वप्ने भंगून गेली

दोष आयुष्याची स्वप्ने
रंगविणाऱ्या जीवांचा 
की निसर्गाचा समतोल
ठेवणाऱ्या पावसाचा ?

दोष पुल बांधणाऱ्या
निपुण ब्रिटिशांचा ?
की वर्षानुवर्ष साथ देणाऱ्या
निर्जीव ईमानी पुलाचा ?

दोष कोसळलेल्या पुलाचा
की जीर्ण असूनही
वाहतूकीस योग्य 
ठरविणाऱ्या त्या सहीचा ? 

आपले प्रशासन
घालेल का लक्ष,
प्रशासकिय कामांत
होईल का सजग अन् दक्ष ?

घेईल का काळजी 
निरागस जनतेची ?
थांबवेल का हत्या
निष्पाप जीवांची ?

अजूनही वेळ नाही गेली
आहेत खूप जीर्ण पूल
करून सन्मानाने निवृत्त
होतील का तिथे नवे पुल ?

सरकार देईल का हमी
जनतेला सुरक्षित प्रवासाची
येतील का अच्छे दिन ?
होईल का पूर्तता आश्वासनांची !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०५-०८-२०१६.












Sent from my iPhone

No comments:

Post a Comment