Saturday, June 1, 2019

रिमझिम रिमझिम !!


रिमझिम रिमझिम !!

रिमझिम रिमझिम पडती धारा
नभोमंडपी लकलखे पारा
मधेच येते ऊन गोजीरे 
घेउन ईन्द्रधनूचे रंग साजीरे

टपटप टपटप पडती गारा
सोबत शितल मंद हा वारा
लाल मातीला घेऊनी चाले
ओथंबूनी भरले नद्या नी नाले

हिरवा हिरवा आसमंत झाला
मोहर संगे लेऊनी सजला
जलंबिंदूंची मोती झालर
हरीततृणांच्या मखमालीवर

कधी बरसतो छमछम छमछम
नादब्रम्ह जसा होई घमघम
संततधार कधी असतो खरोखर
अभिषेक जणू करी या धरतीवर

कधी कधी तो मूसळधार होतो
रौद्र रूप ही सहज घडंवीतो 
श्रावण सरींसह कधी बहरतो
ऊन पावसाचा खेळ सजवीतो

पावसात चिंबचिंब चला भिजूया 
मस्तमस्त आनंद खास घेऊया !!

प्रशांत कदम,
२४-०७-२०१३,






Sent from my iPhone


Sent from my iPhone

1 comment: