विरह
Sent from my iPhone
काहीच कसे मला जमेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना
प्रयत्न पण, किती मी केले
आठवण सरावी म्हणून वाचन केले
पुस्तकात ही,मन रमेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना
बागेत ही जावून बसलो
निसर्गाच्या, छायेत राहीलो
परिणाम पण, उलटा झाला
आठवणींच्या हिंदोळ्यांनी फेर धरला
हिरवळीत ही, मन खुलेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना
मंद संगित ऐकत बसलो
सूर, स्वरांत धून ही गायलो
नाद सुरांनी पण, घात केला
तुझ्याच स्वरांचा ठेका पकडला
संगीतात ही, मन रिझेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना
मन:शांतीस राऊळात गेलो
ईश्वर चरणी लीन झालो
नाद ब्रम्ह पण, स्वैर विखूरला
तुझीच रूपे भासवू लागला
राऊळात ही, शांती मिळेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना
लोचने माझी अधीर झाली
तुझ्या दर्शना झुरू लागली
आता परतून पण, ये माघारी
शपथ, सोडली दुनियादारी
तुझ्या विना, काही कळेना
विरहात तुझ्या क्षणभर ही करमेना.
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०९-१०-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment