बंद मूठ
बंद मुठीतून वाळूचे कण निसटतायत
तसे हळूहळू आयुष्य निघून चाललंय
अन् आपण मात्र भ्रमात वावरतोय
वर्षा वर्षाने मोठे होतोय म्हणतोय
वाळूचे कण म्हणजे आपले बालपण
जपायला हवा त्यातला अल्लडपणा
जगायला हवी त्यातली निरागसता
अनुभवायला हवा, तो खेळकरपणा
मुठीतून खाली घसरताना येते मजा
आवडते हळुवारपणे सरकणे, घसरणे
जणू हसत हसत लडीवार जगणे
तेच आयुष्यातले नटणे अन् मुरडणे
मुठ जशीजशी होतं जाते रिती
मुठीतल्या अंधाराची वाटते भिती
अल्लडता नष्ट होते, येते शहाणपण
साथीने येते जबाबदारीचीही जाण
म्हणूनच जणू म्हणतात
झाकली मूठ सव्वा लाखाची
रिती झाली तर बालपणा विना
पोकळ मूठ काय कामाची ?
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२६-०७-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment