पावसा पावसा ये ना जरा
पावसा पावसा ये ना जरा
पैसा देईन, तूला मी खरा
सरी ग सरी धावत ये
अंगणात पाणी साचून दे
पावसात आम्ही मजा करू
नाचू ,गावू मस्त भिजू
पाण्या मध्ये होड्यां सोडू
मुला मलींच्या खोड्या काढू
रिमझिम रिमझि पाऊस आला
सूसाट वारा सोबत आला
ढगांचा गडगडाट होऊ लागला
वीजांनीही लखलखाट सूरू केला
चहूकडे मिट्ट अंधार दाटला
मुलांच्या पोटात गोळा आला
घाबरून मुले घरात पळाली
आई बाबांच्या कुशीत शिरली
प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
२७-०७-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment