Saturday, June 1, 2019

तूज शिवाय कोण मला !


तूज शिवाय कोण मला !

लाख वेळा सांगूनही 
का अशी तू वागते ?
झाल्यावर वाद आपले
मनास माझ्या लागते

दर्शवू नको चुका
एव्हढे तरी एैक तू
तोल माझा सुटतो
का नाही समजत तू ?

गुण चांगले नाहीत कदाचित
अवगुणही नाहीत मला
जसा आहे तो तूझाच
का कळत नाही तूला ?

गुण माझे वर्णू नको पण
सतत चुका दर्शवू नको
माफक अपेक्षा एक माझी
बाकी काही देऊ नको

दाखवील्या सतत चुका
तर मानहानी वाटते
असेलही ते कदाचित
माझ्या वाढत्या वय परत्वे 

खास विनंती माझी तूला
समजून घे तूच मला
शुल्लक चुका सोड तू
तूज शिवाय कोण मला ?

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२४-०८-२०१६.






Sent from my iPhone

No comments:

Post a Comment