मंगलमूर्ति मोरया
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!
तुम्हीच आमचे रक्षणकर्ता
तूम्हास आम्ही विनवीतो आता
सकलजनांची पीडा वेदना
दूर करावी हीच प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!
तुम्हीच आमचे पालनकर्ता
चरणी तुमचे ठेवीतो माथा
दुःख आमचे दूर करा हो
सुख समृद्धी घेउन या हो
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!
तुम्हीच आमचे भाग्य विधाता
मंगलमूर्ति तुम्ही विद्या दाता
ज्ञान देऊनी साक्षर करता
सरस्वतीचा आशिर्वाद द्या हो
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!
तुम्हीच आमचे तारणकर्ता
आमचे रक्षण तूम्हीच करता
वंदन करूनी तूम्हा पुजितो
आस कृपेची आम्ही ठेवीतो
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया
आमच्या साठी धावून या
तुम्ही आमच्या साठी धावून या !!
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१८-०८-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment