Saturday, June 1, 2019

सशक्त मराठा !


सशक्त मराठा


जे घडत नव्हते कधि
तेच लागले होते घडू
ऊस ही लागत होता
गोडा ऐवजी कडूच कडू

दैव हे असे का फिरले
कुणास ते का न कळले
घड्याळाचे काटे सुद्धा
का असे हे उलटे फिरले

यातना ही असह्य झाल्या
शेवटच पुढे दिसू लागला
मरणासन्न अवस्थेत ही मात्र
क्षणोक्षणी जोडीदार दिसला

अन् सारे प्राण एकवटले
भवितव्यासाठी मग कुटुंबाच्या
संकटाचा त्या करण्या सामना
प्रत्येकाने हाती घेतला प्रत्यंचा

मनातील मरगळ केली दूर
एकजुटीचा विणला दोर
एकएक करित सर्वांनी
अस्तित्वासाठी लावला जोर

सारेच मग प्रेरीत झाले
'स्व' त्वा साठी लढू लागले
आपापसातील वाद सोडून
शत्रूं विरूद्ध रण फुंकले

वरिष्ठांनी व्यूह रचना केली
सर्व शक्तीने केली चळवळ
स्नेहांकितांचे घेतले सल्ले
नवदुर्गेचे मिळविले पाठबळ

संकटानेही मग हार मानली
चांगले क्षण येऊ लागले
कामे भरभर होऊ लागली
अशक्तपण नाहीसे झाले

मराठी बाणा एकत्र आला
शत्रूंचा ही संहार झाला
अशक्तपणाचा विनाश केला
सशक्त मराठा गर्जू लागला

ठेवीदारांनाही दिला दिलासा
विश्वास प्रेम परत मिळविले
अपराधीपण मनीचे पुरते सरले
मराठा बॅंकेच्या आनंदास उधाण आले !!

प्रशांत कदम
८-९-२०१५.












जे घडत नव्हते कधि
तेच लागले होते घडू
ऊस ही लागत होता
गोडा ऐवजी कडूच कडू

दैव हे असे का फिरले
कुणास ते का न कळले
घड्याळाचे काटे सुद्धा
का असे हे उलटे फिरले

यातना ही असह्य झाल्या
शेवटच पुढे दिसू लागला
मरणासन्न अवस्थेत ही मात्र
क्षणोक्षणी ठेवीदारच दिसला

अन् सारे प्राण एकवटले
भवितव्यासाठी मग सर्वांच्या
संकटाचा त्या करण्या सामना
प्रत्येकाने हाती घेतला प्रत्यंचा

मनातील मरगळ केली दूर
एकजुटीचा विणला दोर
एकएक करित अनेकांनी
अस्तित्वासाठी लावला जोर

सारेच मग प्रेरीत झाले
'स्व' त्वा साठी लढू लागले
आपापसातील वाद सोडून
शत्रूं विरूद्ध रण फुंकले

वरिष्ठांनी व्यूह रचना केली
सर्व शक्तीने केली चळवळ
स्नेहांकितांचे घेतले सल्ले
नवदुर्गेचे मिळविले पाठबळ

संकटानेही मग हार मानली
चांगले क्षण येऊ लागले
वसुली भरभर होऊ लागली
थकबाकीदारही नाहीसे झाले

मराठी बाणा एकत्र आला
थकबाकीदारांचा संहार झाला
अशक्तपणाचा विनाश केला
सशक्त मराठा गर्जू लागला

ठेवीदारांनाही दिला दिलासा
विश्वास प्रेम परत मिळविले
अपराधीपण मनीचे पुरते सरले
मराठा बॅंकेच्या आनंदास उधाण आले !!

प्रशांत कदम
८-९-२०१५.














Sent from my iPhone

No comments:

Post a Comment