पावसातला निसर्ग नजारा
बरसत आल्या ह्या जलधारा
नभोमंडपी लखलखाट अन् वारा
हरिततृणांची लेऊन चादर
फुलवित मनांत मोरपिसारा !!
ईंद्रधनुचे सप्तरंग तरंगती
जणू छत्री धरली अवनी वरती
रंगछटा मोहक खुलुन दिसती
कोसळणा-या मेघां भोवती
क्षणांत होतो अंधार गडद हा
क्षणांत लख्ख प्रकाश पहा
श्रावण सरींचा खेळ सारा
पावसातला हा निसर्ग नजारा
प्रशांत कदम,
०६-०७-२०१६
९५९४५७२५५५.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment