गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया
मंगलमय रूप तुझे हे सुंदर
गळ्यात कंठी, भाळी शेंदूर
कटी पितांबर, हाती मोदक
एकदंत तू , लंबोदर मोहक
देवा, एकदंत तू लंबोदर मोहक !!
गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया
जास्वंदीची तव फुले वाहतो
दुर्वांकुराचा हार घालतो
करतो तूझी पुजा विधीवत
तुजला आमचा दंडवत
देवा, तुजला आमचा दंडवत !!
गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया
विराजमान तू या मुषकावर
हिरे जडीत मुकुट शिरावर
अलंकार ते अमुल्य कानन
प्रसन्न करते नुसते दर्शन
देवा, प्रसन्न करते नुसते दर्शन
गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया
तूला पाहता दुःख ही सरले
आनंदाला अती उधाण आले
कृपा तूझी रहावी आम्हावरी
हिच प्रार्थना करतो खरोखरी
देवा, प्रार्थना करतो खरोखरी !!
गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
१८-०८-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment