मैत्री
खुलता कळी खुलेना
का ? ते मला कळेना
किती वेळा असे झाले
स्वताला मीच समजावले
तिच्या अपेक्षा खूप होत्या
न पटण्या सारख्याही नव्हत्या
प्रयत्नात काही नव्हते कमी
तरीही ठरत होतो कुचकामी
परिस्थिती प्रतिकूल होती
यशाची साथ मिळत नव्हती
तिच्या समोर फिका ठरलो
नजर भिडवू नाही शकलो
माझी मलाच खंत वाटली
पण हार मात्र नाही मानली
पुन्हा मैत्री मिळवण्या साठी
मी माझी कंबर कसली
येईल एक दिवस माझा
उतरेन मी परिक्षेत खरा
संपून जातील सर्व अवगुणं
परिस्थिती ही होईल अनुकुल
समोरूनच पुढे येईल हात
मैत्रीची असेल तिच खरी साथ
घेउन मग हातात हात
आयुष्याची होईल सुगम्य सुरूवात !!
प्रशांत कदम ,
९५९४५७२५५५.
०८-०८-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment