Saturday, June 1, 2019

सूर असे जुळू दे !


सूर असे जुळू दे
गीत माझे फुलू दे
हृदयातील भाव माझ्या
तुझ्या अंतरी घूमू दे

तव प्रितीचे अविरत
दिवा स्वप्न पाहिले
मनोमनी सदैव तूला
आपले मी मानले

आज पूर्ण कामना
होईल असे भासले
होता दर्शन अचानक
खास असे वाटले

नजरेत सहज तुझ्या
अनुकंपा मी जाणली
सजग ती संवेदना
मला नकळत समजली

रोख तुझ्या भावनांचा
अलुवार मी जाणला
गंध तुझ्या श्वासातला
मला क्षणांत भावला

स्वर सूर आपले
एकसूरी ते जाहले
स्वप्नातील गीत आज
शब्दांत हळूवार गुंफले

प्रशांत कदम
५-२-२०१६.





Sent from my iPhone

No comments:

Post a Comment