अत्याचार
गरम तव्यावर पाणी शिंपडल्यावर
येणाऱ्या आवाजा प्रमाणे
मुसमुसून हमसून ती रडत होती
आठवण पुसण्याचा प्रयत्न करत होती
पण ते अजिबात जमत नव्हत
कारण तिच्या दुर्बल शरीरात जीव होता
पण कोमल शरीरावर झालेले आघात
अत्याचार कोरले गेले होते हुदयात
तिच्या मनातील कटू शल्य
सतत खूपत होते काळजात
ओढवलेल्या विचित्र अनुभवांमुळे
ती एवढी विषण्ण झाली होती
दोष नव्हताच मुळी कधि तिचा
होता समाजातील विकृतीचा
नराधमांनी साधला होता डाव
एकाकी गाठून घातला गेला घाव
प्रश्न तिचा केवळ एकच होता
त्यांचे मी काय वाईट केले होते ?
त्यांना त्यांचे कुटुंबिय नव्हते का ?
आई बहीण पत्नी कुणी नाही का ?
केवळ विकृत लालसे पोटी
केला गेला अमानुष अत्याचार
अन् निरागसतेला आयुष्यातूनच उठविले
न्याय व्यवस्था करेल का याचा विचार
मिळेल का न्याय निरागस मुलीला ?
थांबेल का समाजातली विकृती ?
प्रशासन घेईल का याची दखल ?
फिरतील का लेकी सूना निर्भयतेने ?
प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
१५-३-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment