श्रावण आला
आला रे आला श्रावण आला
चातुर्मास हा सूरू जाहला
श्रावण सरीं नी जोर धरला
हिरवळ दाटली चहू बाजूला
आला रे आला श्रावण आला
क्षण सौख्याचे घेऊन आला
ऊन पावसाचा खेळ सजला
लेऊनी इंद्रधनुषी तोरण नभाला
आसमंत ऊल्हसित करून गेला
आला रे आला श्रावण आला
सण वर्षांचे घेऊन आला
घरो घरी आनंद दाटला
नागपंचमी सण हा पहिला
मंगळागौरीचा खेळ रंगला
आला रे आला श्रावण आला
दर्याची पुजा नारळी पुनवेला
राखी बांधते बहीण भावाला
सप्तमीला कृष्ण जन्म सोहळा
अष्टमीला होईल गोपाल काला
आला रे आला श्रावण आला
सांगता याची पिठोरी अवसेला
ऊधाणच येते पुजा अर्चेला
उपवास धरोनी महिना सरला
श्रावणात या सत्संग बहरला
आला रे आला श्रावण आला !!
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०३-०८-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment