अजूनही वेळ गेली नाही
तू काम केले नाहीस तरी
माझे काही अडणार नाही
तूझ्या काम न करण्याने
माझे काही बिघडणार नाही
पण अशा ह्या वागण्याने
होतोय परिणाम ग्राहक सेवेवर
आणि पर्यायाने तुझ्याच
संस्थेच्या भवितव्यावर
आज कदाचित मिळत असेल
जरी तुला पूर्ण पगार
पण भविष्यात काय ?
याचा देखील कर विचार
तुझ्या बेजबाबदार वागण्याने
ग्राहक घेतो काढतां पाय
तेच नसले तर काऊंटरवर
बसून करशील काय ?
आईवडिलांच्या पुण्याईने
श्रेष्ठिंच्या आशीर्वादाने
विनासायास मिळवलीस
ही सफेद काॅलरची नोकरी
त्याची तरी जाण ठेव
परिस्थितीचे भान ठेव
कितीतरी सुशिक्षित आहेत बेकार
त्यांच्या दुर्दशेवर तरी लक्ष ठेव
प्रशांत कदम
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment