श्रेष्ठ निर्माती
निर्मिती निर्मिती
म्हणजे तरी काय ?
मनांतील संकल्पनांची
सर्जनशील मांडणी
दुसरे काय !!
चित्रकाराची निर्मिती म्हणजे
त्याच्या मनातील कल्पना
विविध रंग कॅनव्हास वर
उतरवून मूर्त स्वरूपात
चित्रवतो, ती त्याची निर्मिती
ईंग्जिनियरची निर्मिती म्हणजे
विविध वस्तू माध्यमे
त्याच्या संकल्पनेनूसार
जोडणी करून केलेली
प्रारूपे, ती त्याची निर्मिती
संशोधकाची निर्मिती म्हणजे
वेगवेगळे प्रयोग करून
शास्त्रीय आराखड्यानूसार
तयार झालेला
शोध, ती त्याची निर्मिती
कवीची निर्मिती म्हणजे
वाऱ्यावर स्वैर ऊडणारी
त्याच्या कल्पनेची भरारी
विचारांची व शब्दांची ताकद
लेखणीत उतरते ती निर्मिती
प्रत्येक निर्माण करत्याची
आपली एक पध्दत
आपली एक खासियत
त्याची विशेष सर्जनशीलता
अशी होते आगळी निर्मिती
प्रत्येकाची निर्मिती श्रेष्ठ
पण अचंबित वाटते
ती सजीव निर्मिती
अशक्य नाही तरीही
अतिशय कठीण निर्मिती
सर्व श्रेष्ठ निर्मिती म्हणजे
स्त्री च्या मात्रृत्वाची शक्ती
नऊ महीने पोटात जपून
संस्कार देऊन प्रसवलेला
सजीव , ती स्त्रीची निर्मिती.
स्त्री आई होतांना
स्वःता धोका पत्करून
नऊ महिने पोटात वाढवून
बाळास जन्म देते
करते एका सजीवाची निर्मिती !!
खरेच प्रत्येक आई मध्ये
श्रेष्ठ सर्जनशीलता असते
जिच्या मुळे तिच्या बाळास
आकार अन् विचार मिळतो
तिच आहे सर्व श्रेष्ठ निर्माती !!
प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
२४-२-२०१६.
Sent from my iPhone
No comments:
Post a Comment