Saturday, June 1, 2019

विश्वास !


विश्वास,

तूझ्याशी माझे, तसे वागणे
थोडे जरा, माझेच चुकले
तूलाच काय, काही क्षणांत
माझे मलाच, पूर्ण खटकले

मनांत अगदी, काही नव्हते
अनाहूतपणे अनावश्यक घडले
बोलण्याच्या, माझ्या नादात
अहंकाराने मला, होते घेरले

स्वत:स आवर, नाही घातला
चूक अकस्मात करून बसलो
तूला नाहक, करून दुःखी
आतताईपणात, पूरता फसलो

प्रामाणिकपणे कबूल करतो
चूकीची ही, मागतो माफी
अबोला तुझा नाही सोसवत
तूझ्या शिवाय, नाही करमत 

तुलाच आहे माझी विनवणी
माफ करून, मन मोठे कर
तूझ्या शिवाय कोण मला
विचार कर, तूच खरोखर 

चुकणार नाही पुन्हा कदापी 
याची तूला, देतो खात्री
चांगला वागेन, सदासर्वदा
विश्वास ठेव, माझ्या वरती

प्रशांत कदम,
२७ - ०१ - २०१७.
९५९४५७२५५५.










Sent from my iPhone

No comments:

Post a Comment