Saturday, June 1, 2019

खूप काही सांगायचंय तूला !


खूप काही सांगायचंय तूला
पण एेकून घेशील का जरा
खरच वेळ देशील का मला
जीवलग बनशील का खरा 

मनांत दडलेले विश्व माझे
लोचनातील निजरुप तुझे
अंतरीच्या या भावना मुक्या
समजुनी तू घेशील का ?

सर्व काही तुझ्याच साठी
काही  ठेवले माझा हाती
रात्रंदिन ध्यास तूझाच होता
दिवा स्वप्ने ही तूझीच होती

तूलाच स्मरूनी उजाडायचे
अन्य कुठे काही समजायाचे
धुंदीतच तुझ्या संध्या जाई
स्वप्नातच पुन्हा पहाट होई

तुझा परी  सहवास मिळे
दुरावाच का पदरात पडे
काय बिनसले काही  कळे
ह्रदयास माझ्या पडती तडे

तूलाच माझे सर्वस्व मानले
मनो मनी आराध्य जाणले
नित्य निरंतर करून ही पुजा
कारे दाखवीशी भाव दुजा

आता तरी सोड हा रूसवा
प्रतिसाद देना माझ्या प्रेमा
हात हाती घेऊन आपण 
प्रितीच्या घेऊ आणा भाका 

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
१५-०३-२०१६.














Sent from my iPhone

No comments:

Post a Comment