Saturday, June 1, 2019

तो स्वच्छ‌ंदी काळ !


एक काळ होता असा
कळायचे नाही 
दिवस संपायचा कसा

रात्र देखील तशीच असायची
बिछान्यात पडल्या पडल्या
झोप यायची

दिवसभर फक्त दंगा मस्ती
काळजी डोक्यावर
कसली नव्हती

छान स्वच्छंदी जीवन असायचे
खायचे खेळायचे
मस्त रहायचे

आता मात्र विपरीत घडले
ताण तणावांनी
मनाला घेरले

रात्र रात्र जागा राहतो
स्वास्थ्या साठी
औषधे घेतो

कामाचाही वाढलाय व्याप
कळत नाही
आशिर्वाद की शाप

होत नाही हिंडणे फिरणे
मौज मजा
मित्र भेटणे

कधि कधि मन हेलावते
उर्वरीत आयुष्याची
चिंता भासते

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२१-०८-२०१६














Sent from my iPhone

No comments:

Post a Comment