Friday, May 31, 2019

सवय एव्हढी लागली आहे !


सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही

आता ह्या मूलांचच बघा
दिवसभर धांगड धिंगा 
अभ्यासाच नाव नाही
मोबाईल अन् टिव्हि  पुढे
दुसरे नाही दिसत काही
फेसबूक अन् व्हाट्सअप सतत
मग तहानभूकही नाही लागत
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही


आई बाबांचा वेगळाच तोरा
माझंच खर हा एकच होरा
घरात आॅफिसात कामात गर्क
तरी फावल्या वेळात तर्कवितर्क
समंजसपणाचे दोघांनाही वावगे
सतत वादविवादाचा फड रंगे
नेहमीच्या अश्या भांडणां पाई
वातावरण मात्र बिघडून जाई
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही

आजी आजोबांचे वेगळेच वागणे
सतत शरीराचे नविन दुखणे
रोज स्वास्थ्याच्या नव्या कुरबूरी
तरी मनात मात्र विठ्ठल हरी
खायचे नाही औषध कुठलेही
डाॅक्टर कडे ही जायचे नाही
मुले नातवंडात रममाण व्हायचे
स्वताकडे मात्र दुर्लक्ष करायचे
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही


शेजाऱ्यांचा एक वेगळाच धर्म
सतत फुकटचा सल्ला हेच कर्म
चांभार चौकश्या करती सर्व
नेमके पकडती दूसर्ऱ्यांचे वर्म
अडीअडचणीत उपयोगी तरी
साखरदह्यासाठी येती घरी
ह्यांनाच जगाची सर्व माहीती
आपलीच सर्वांना सांगती महती
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही !!

प्रशांत  कदम,
९५९४५७२५५५
२७-०३-२०१४.






Sent from my iPhone

No comments:

Post a Comment