नको ना ग प्रिये तू फुरंगटुन बसू
Sent from my iPhone
नको ना ग प्रिये तू फुरंगटुन बसू
मोकळपणाने दोघे चल बरे हसू
गैरसमज कधीच नको ठेवू मनी
वादच वाढतात येतय का ध्यानी
आनंदाचे क्षण ही जातात फुकट
दिसतां तुझी नजर अशी तिखट
नाही करमत काही नाही सुचत
तुज शिवाय कुणी नाही दिसत
दिवस रात्र घोळतो एकच विचार
रागाचा पारा कसा शांत होणारं
संयम ठेवूनच जीव होतो बेजार
तुझा बळावता फुकाचा आजार
जेवणात ही त्याची जाणीव होते
भाजीत मीर्ची, डाळीत मीठ नसते
कधी भांडीच करतात शांतता भंग
पाहताच मला मोबाईल मध्ये दंग
बोलली नाहीस तर करु तरी काय
आहे सांग कोण मोबाईल शिवाय
म्हणून प्रिये नको फुरंगटुन बसू
मोकळपणाने दोघे चल बरे हसू
प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२४-०९-२०१७.
No comments:
Post a Comment