Wohoo!,
स्वातंत्र्य दिनी शपथ घेऊ
देशातले धन देशातच ठेऊ,
स्वदेशी जोपासायला
स्वातंत्र्याचा लढा दिला,
विदेशींना पीटाळूंन लावले
आणि राष्ट्र स्वतंत्र झाले,
स्वातंत्र्य मिळवल्यावर मात्र
स्वदेशीचे महत्व ओसरले,
विसरून गेलो स्वदेशी मंत्र
ज्ञान विज्ञानाचे आपले तंत्र,
विदेशांनी पुन्हा साधला डाव
अर्थ व्यवस्थेवरच घातला घाव,
विदेशी वस्तूंची लावली सवय
तरूणानाही आता तेच हवय
विदेशी गॅजेटनी वेड लावलय
चलनाचही स्त्रोत बिघडवलय,
आता मात्र पुन्हा जागे होऊ
स्वदेशी वस्तूंनाच उत्तेजन देऊ,
अर्थ व्यवस्था करू भक्कम
देशात आणू परकीय रक्कम,
म्हणून पुन्हा सर्व एकत्र येऊ
स्वदेशी वस्तूच खरेदी करू
भारतमातेला सशक्त करू ,
स्वातंत्र्य दिनी शपथ घेऊ
देशातले धन देशातच ठेऊ !
No comments:
Post a Comment