नाही ऊमगले कधी
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
गोड हसण्यावरी हा कधी भाळला
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
गोड हसण्यावरी हा कधी भाळला
हासरी लाजरी स्वप्नी दिसशी मला
गंध श्वासातला ह्रदयी मिसळला
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
रेखीव रूपावरी सहजच सूखावला
गुलाब पुष्प जणू लागले दिसायला
आसमंतातही मंद सुगंध दरवळला
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
लाघवी शब्दांमधे अपसूकच थांबला
अवखळ स्वर हे तूझे मोहवी मनाला
एकरूप होउनी नादब्रम्हच गरजला
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
स्नेह आपुला कसा साधला वाढला
साद मी घातली प्रतिसाद लाभला
प्रितीचा छंद हा मोहरला बहरला
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
सहवास तूझा हवा हवासा वाटला
स्वप्नातही विरह नकोसा जाहला
बेचैन रात्रीं मधे जीव हा तळमळला
नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला
गोड हसण्यावरी हा कधी भाळला
प्रशांत कदम
२० - ०६ - २०१४.
९५९४५७२५५५,
Sent from my iPhone
Show quoted text
No comments:
Post a Comment