Friday, May 31, 2019

गणित संसाराचं

गणित संसाराचं !

तूझ्या माझ्या संसाराचंगणित आहे पक्क
तूझा मजवरमाझा तूजवर आहे पूर्ण हक्क

माझे तुझे प्रेमसांग करू तरी कशास व्यक्त 
शब्दांची गरज वाटत नाहीआहे ते अव्यक्त 

तूझ्या शिवाय जगातजिवलग नाही दोस्त
सुखी संसाराचीआपल्या दोघांवरच भिस्त

जरी लांब गेलो तरीनाते राहील आपले घट्ट
तुझ्या साठीच हवे ते करीनपुरविन तुझे हट्ट

तूझ्या वरचे माझे प्रेमतुलाच कळेल फक्त
जाणीव सतत याची ठेवताकीद तूला सक्त

तू नी मी दोन नव्हेतचआहोत एकरूप सदैव
तुझ्या माझ्या प्रेमातयेऊ शकत नाही दुर्दैव

हेच आपल्या सुखी संसाराचंगमक जबरदस्त 
असेच आपले प्रेम राहू देतएकमेकांवर मस्त

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१२-०६-२०१८.




No comments:

Post a Comment