Thursday, May 30, 2019

मी कुठे म्हणालो 'मेम' मिळावी

मी कुठे म्हणालो 'मेम' मिळावी

मी कुठे म्हणालो 'मेम' मिळावी
फक्त मैत्रीण म्हणून 'डेम' मिळावी
     मित्रांना अनेक मिळतात मग 
     मला किमान एक तरी मिळावी

आजू बाजूस खूपच दिसतात 
फक्त त्यातली एकच मिळावी
     इतरां सारखी ती गोड वेदना
     मला ही अनुभवण्यास मिळावी

गालावर डिंपल नसली जरी
फक्त छान हसणारी मिळावी
     मेनके इतकी सुरेख नकोच
     मला थोडी रेखीव मिळावी

शेवग्याची शेंग नसली जरी
फक्त तब्बेत्तीला बेताचीच मिळावी
     दिपीका एवढी स्लीम नसावीच
     तर मला शोभेल अशीच मिळावी

मधूर गाणारी नसली तरी
फक्त जरा बोलकी मिळावी
     साखरे एवढी गोड नकोच
     सायी सारखी प्रेमळ मिळावी

खूप शिकलेली नसली जरी
व्यवहार ज्ञानी मात्र असावी
     अति शहाणी नकोच नको
     माझ्या सारखी समजदार मिळावी

मी कुठे म्हणालो 'मेम ' मिळावी
फक्त मैत्रीण म्हणून 'डेम ' मिळावी

प्रशांत कदम

No comments:

Post a Comment