Friday, May 31, 2019

सूर असे जुळू दे

सूर से जुळू दे
गीत माझे फुलू दे
हृदयातील भाव माझ्या
तुझ्या अंतरी घूमू दे

तव प्रितीचे अविरत
दिवा स्वप्न पाहिले 
मनोमनी सदैव तूला 
आपले मी मानले

आज पूर्ण कामना 
होईल असे भासले
होता दर्शन अचानक
खास असे वाटले

नजरेत सहज तुझ्या 
अनुकंपा मी जाणली
सजग ती संवेदना
मला नकळत समजली

रोख तुझ्या भावनांचा
अलुवार मी जाणला
गंध तुझ्या श्वासातला
मला क्षणांत भावला

स्वर सूर आपले
एकसूरी ते जाहले
स्वप्नातील गीत आज
शब्दांत हळूवार गुंफले

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
--२०१६.


Sent from my iPhone

No comments:

Post a Comment