Monday, May 27, 2019

स्वप्न

परिकथेसम स्वप्नी येवून, आनंद मनाला देशील का ?भास स्वप्नाचा तरी अचानक, मूर्त तयाला करशील का ?
या हृदयाची धक धक न्यारी
अपसुक समजून घेवून सारी
तूझाच राजा मला करोनी, माझ्या संगे नांदशील का ?

परिकथेसम स्वप्नी येवून, आनंद मनाला देशील का ?
भास स्वप्नाचा तरी अचानक, मूर्त तयाला करशील का ?

ज्या रूपाची आस राहिली
मनोमनी मी जिला पाहीली
तिच ललना प्रत्यक्ष बनोनी, कवेत माझ्या येशील का ?

परिकथेसम स्वप्नी येवून, आनंद मनाला देशील का ?
भास स्वप्नाचा तरी अचानक, मूर्त तयाला करशील का ?

नयन मनोहर रूप देखणे
गालातच ते मुग्ध हासणे
गाल गोबरे, ओठ गुलाबी, चुंबन घेवू देशील का ?

परिकथेसम स्वप्नी येवून, आनंद मनाला देशील का ?
भास स्वप्नाचा तरी अचानक, मूर्त तयाला करशील का ?

मम हृदयाची तार छेडली
परि परी सम सदा वाटली
सात जन्माची साथ देवूनी, अशीच जीवनी राहशील का ?

परिकथेसम स्वप्नी येवून, आनंद मनाला देशील का ?
भास स्वप्नाचा तरी अचानक, मूर्त तयाला करशील का ?

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
०३-०७-२०१८.

No comments:

Post a Comment