Thursday, May 30, 2019

पाऊस म्हणजे कलाकारांचं दैवत !

पाऊस म्हणजे कलाकारांचं दैवत

पाऊस म्हणजे कलाकारांचं दैवत
त्यांच भाव विश्वस्फुर्ती स्थान
त्याच्या आगमनातूनच घडतात
नव नवीन कलाकृती महान

कवीला स्फुरते नवी कवीता
संगीतकारास सुरेल ताल
लेखकाला अप्रतिम कल्पना
चित्रकारास चित्ररूप भावना

निसर्गाच्या ह्या किमयेने
नदीनाल्याना मिळते पाणी
वृक्षवल्लींची खुलते कळी 
गगनाला ईंद्रधनुची झळाळी

पावसाच्या पाण्या मुळेच
फुलते शेतकऱ्यांची शेती
खुलतात बाग बगिचे अन् 
पानापानांवर तरंगतात मोती

पावसाने झाडा,फुलांना येते बहार
कलाकारांच्या सृजनशक्तीला बहर
पावसा तू बरसत रहा ढगांतून बाहेर
चराचरांत फुलवत रहा असाच मोहोर

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२४-०७-२०१६.








No comments:

Post a Comment