Friday, May 31, 2019

हे मेघांनो दूर व्हा !

हे मेघांनो दूर व्हा

हे मेघांनो दूर व्हा
पूर्ण चंद्र दाखवा जगा
पौर्णिमेची ही रात्र आज
गगनास असो चंदेरी साज
नको झाकाळू चंद्र तरंग
खुलु दे गगनी ताऱ्यांची बाग
नको लपंडाव रोज रोज
लखलखू दे अहोरात्र तेज
नीरव शांत तव आकाशात
बहरू देत ग्रह ताऱ्यांची प्रित
पाहू देत सृष्टीस सहज
चंद्र किरणांची तीव्र गजबज
पौर्णिमेच्या शुभ्र लहरी
झळकू दे रात्र प्रहरी
गडद झालर दूर सारूनी
आनंदमय होऊ दे रजनी
हे मेघांनो दूर व्हा
पूर्ण चंद्र दाखवा जगा
पौर्णिमेची ही रात्र आज
गगनास असो चंदेरी साज !!

प्रशांत कदम, 
०२-०८-२०१७.
९५९४५७२५५५.




  


Sent from my iPhone

No comments:

Post a Comment