एवढे तरी दे पांडुरंगा
भरभरून नकोच मजला
पुरेसे येवू दे वाटेला
फक्त लागू देत मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
नाही लालसा संपत्तीची
ना हव्यास लक्ष्मीचा
संसार लागावा मार्गा
एवढे तरी दे पाडुरंगा
दुष्कर्म कधी न घडावे
हातून ह्या आमुच्या
सत्कर्मच येवू दे मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
सेवा तूझीच व्हावी
मनी सदा हाच भाव
चिंतीतो तुलाच मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
ऊणे नको पडु दे
आम्हा कधीच काही
चिंता न येवोत मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
दुख लोपूनी सुख यावे
कष्ट विफल न जावे
यशच मिळावे मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
मागणे मागतो एकच
मन तुझ्यात रमावे सतत
नको वळवू वाम मार्गा
एवढे तरी दे पांडुरंगा
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१२-०७-२०१८.
No comments:
Post a Comment