Friday, May 31, 2019

पौर्णिमा

पौर्णिमा 

काळ्याभोर केसांतूनी चेहरा तुझा लकाकला
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जणू, मज खरेच भासला

रूप तुझे गोड देखणे, मोत्यांसहीत हासले
मद मोहक नेत्र जणू , ताऱ्यांसम चकाकले

गालावर गुलाब कळी, मंद स्मित लाजरे
पापण्यांची हाल चाल, नेत्र जणू भारावले

मंद मंद वाऱ्या समवेत, केस कसे भुरभुरले
चंद्रावर झाकोळलेले, ढगच जणू सरकले

रूपावर मी भाळलो, रहा अशीच समीप तू
सोडून कधी जावू नको, माझीच आहेस तू

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
२०-१०-२०१७.






Sent from my iPhone

No comments:

Post a Comment