Friday, May 31, 2019

पोरग बिचारं माझं !

पोरग बिचारं माझं

कळत नाही पुढे 
व्हायचं हीच कसं
पोरग बिचारं माझं
साधं आहे तसं

छक्के पंजे कसले
नाही समजत काही
निरागसता तिच्यातली
कधिच संपत नाही

राग मात्र तिचा
नाका वरच असतो
क्षणो क्षणी पारा
वर वरच चढतो 

मना विरूध्द घडलेले
होतं नाही सहन
मनांत सतत तिच्या
प्रश्न पडतात गहन 

अल्लडता तर तिची
पहात रहावीशी वाटते
फुलपाखरा समान
भिरभीरत ती असते

गमतीत तिची कधि
घेतली जरी फिरकी
काहीच कळत नाही 
धुंदकीतच घेते गिरकी

रागावली रूसली तरी
होते क्षणार्धात शांत
निर्मळ प्रसन्न मनाने
ती रमते आनंदात 

प्रेम व्यक्त करण्याची
तिची पद्धतच वेगळी
लाडात येउन भांडण्यात 
ताकद लावते सगळी

कळत नाही पुढे 
व्हायचं हीच कसं
पोरग बिचारं माझं
साधं आहे तसं !!


प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१२-०२-२०१६.









Sent from my iPhone

No comments:

Post a Comment