वाट
वाट तूझी पाहीली होती
अनेकदा ऊपाशी
तहान भूक विसरून केली
मैत्री मी तूझ्याशी
चित्त माझे नव्हते जागी
स्वैर दहा दिशांशी
मीच माझा ऊरलो नव्हतो
गुंतलो मी तूझ्याशी
दिवस रात्र जागवले होते
आठवणी ठेवूनी ऊशाशी
प्रीत फुले सजवित बसलो
मुग्ध मी तूझ्याशी
तमा कधी नव्हती ठेवली
सोबतच्या जगाची
भान हरपून केली होती
प्रीत मी तूझ्याशी
तूझ्या मुळे झगडलो होतो
आप्त स्वकियांशी
सखे बघ बांधीत असतां
बंध मी तूझ्याशी
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१७-०७-२०१८.
No comments:
Post a Comment