Saturday, June 29, 2019

मुग्धा !

हट्टी आमची मुग्धा जरी
सोज्वळ सुंदर जशी परी
शिस्त लावू की कौतुक करू ?
कळीच होतंय फुलपाखरू 

अवखळ तिचे वर्तन वाटे
निरागस परंतू बोलणे असे
ऐकत राहू की गप्प करू ?
कळीच होतंय फुलपाखरू 

दिपीकाची ती फॅन भारी
मनी,स्वप्नी तिलाच पाही
तिला आवरू की दुर्लक्ष करू ?
कळीच होतंय फुलपाखरू 

अभ्यासात तिचे लक्ष नसे
टिव्हि मोबाईल मधे ती रमे
छडी घेऊ की रागे भरू ?
कळीच होतंय फुलपाखरू 

अभ्यासाचा आईचा ध्यास
तिचा मात्र वेगळाच अट्टाहास
बाजू घेऊ की शिक्षा करू ?
कळीच होतंय फुलपाखरू 

वादातून मग भांडण वाढे
पाठीवर आईचा धपाटा पडे
कोणास विचारू हे काय सूरू ?
कळीच होतंय फुलपाखरू 

भांडून मुसमुसून होताच पुरे
आईच्या कुशीत हसतच शिरे
आईचे ममत्व अन् लाड सूरू
कळीच होतंय फुलपाखरू 

शिकून सक्षम तिने व्हावे
जीवनात ही यशस्वी रहावे
या साठी आम्ही काय करू ?
कळीच होतंय फुलपाखरू  !!

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
१५-०५-२०१५..

Sent from my iPhone

Friday, June 28, 2019

मुंबई !!

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

भर भर कर यहां रोज युं आते है कंई लोग
बसने यहा, मंदिर मस्जिद चढाते है वों भोग
उनकी तम्मनाओंका आदर करना ही पडेगा
होती हो मुसिबत पर हमे सहना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

चलना भी नहीं मुमकिन, बच्चे कहा खेलें
हर बचे तुकडे पर यहां बस रहे है मोहल्ले
बची हुई जगह पर गुजारा करनाही पडेगा
होती अगर भीड पर हमे सहना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

गाडीयां तो यहां रुक रुक कर है चलती
पब्लीक यहां शांती से चल भी नहीं सकती
हवा भी तो यहां अब कार्बनकी हैं मिलती
बढते हुये प्रदुषण को युहीं सहना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

पेडोंकी जगह बन रहे है कांक्रीट के जंगल
गली गली शहर शहर बस हो रही है दंगल
अब कुछ नहीं कुशल यहाँ कुछ नहीं मंगल
बची हुई जींदगीको युहीं बिताना ही पडेगा

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

बारीश भी यहां आती है तो आती है जोरसे
बह जाते है सब रस्ते और होते है क‌‌ई हादसे
पब्लीक ही करती है फिर मदत अपने मनसे
ईन्सानियत ही तो दिखती है लोगोंकी शानसे

मुंबई में रहना है तो सब भुगतना ही पडेगा
हो लाख मुसिबतें पर हमें सहना ही पडेगा

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२८-०६-२०१९.

Monday, June 24, 2019

ट्रायल !!

ट्रायल रुम च्या दरवाजा बाहेर 
बिचारा नवरा होता ताटकळत
खांद्यावर लाईफस्टाईलची बैग
अन् मोबाईल वर होता खेळत 

आजुबाजुला बायकांचा गराडा
हा संकोचाने उभा होता बिचारा
मधे मोबाईल मधुन मान काढत
गप बघत होता बाहेरचा नजारा

मधेच दरवाजात यायची ललना
शू शू करत नव-याला शोधायची
अंगावर चढवलेला नवीन ड्रेस
मुरडत येवून दाखवून जायची 

वा किती छान, हा सैल, हा तंग
अशा अनेक कमेंट होता ऐकत
मोबाईल मध्ये खेळता खेळता
चोरुन बघत होता सगळी गम्मत

तेवढ्यात बायको आली दारावर
चढवून एक भन्नाट ड्रेस अंगावर
शू शू , अहो बघा तरी कशी दिसते
दोन शब्दांत नवरा आला भानावर

तिला बघुन त्याचे डोळे विस्फारले
नको, छी, छी त्याने मानेने दर्शवले
अहो असे काय करता नीट बघा तरी
तिने रागात त्याला जोरात फटकारले

त्या नंतरचा तिचा तो तिखट कटाक्ष 
बघताच त्याने हसू आणले गालावर
मस्त खूपच छान दिसतोय तूझ्या वर
म्हणत लक्ष केंद्रित केले मोबाईलवर

प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२३-०६-२०१९.

Sunday, June 23, 2019

वाट पावसाची !

कृष्ण मेघ पर्जन्याचे
येणार कधी अंबरात
वाट अशी पाहू किती
पावसाची अंगणात

नदी नाले शूष्क झाले
सरले पाणी जलाशयांत
तप्त सूर्य किरणे केवळ
तळपती आकाशात

लाही झाली सर्व अंगाची
चिंता क्रोध मना मनांत
पर्जन्या साठी करीती कुणी
यज्ञ उपासना देवळांत

नको क्रोध पावसा दाखवू
बरसून ये अंबरी लवकरात
तृष्णा तृप्त जल धारांनी
आनंद बहरु दे चराचरांत

प्रशांत कदम
९५९४५७२५५५
२४-०६-२०१९.

Wednesday, June 12, 2019

भेट पहील्या पावसाची !!


भेट पहील्या पावसाची !!

ती सांज ओली ओली
तो थंड थंड वारा
मीठी ती तूझी माझी
तो श्वास गंध न्यारा

आठवते मला अजुन ही
ती रम्य वेळ पावसाची
लख लख त्या विजांची
अन् धक धक ही ह्रदयांची

बिलगून होतीस तू मजला
विसरुन सर्व जगाला
आवर घालीत होतो
दोघेही आपल्या मनाला

भिजली तू चिंब होतीस
रिम झीम त्या सरींनी
तनं एकरुप झाली होती
मंतरलेल्या त्या क्षणांनी

पहील्या पावसाची ती
आगमनाची वेळ होती
अविस्मरणीय नात्याची
मिलनाची गळाभेट होती

प्रशांत कदम.
१२-०६-२०१९

९५९४५७२५५५.

Sunday, June 2, 2019

घायाळ !


घायाळ !

दिलखेचक चाल तुझी
भुरभुरती केस सुरेख
तुडवीत चाललीस हृदये जणू
पावला पावला गणीक

मोहक सुंदर रूप तुझे
वर झुळझुळता तलम पोशाख
रोखल्या नजरा किती तरी
घायाळही झाले लाख

विचलीत तरीही नव्हतीस
तू रममाण आपल्या धुंदीत
वेग ही बदलू नाही दिलास
चाललीसच होती मस्तीत

इथे तरळली लाखो स्वप्ने
धड धड अनेक हृदयांत
अन् अचानक ठेच लागूनी
पडलीस तू रस्त्यात

हळहळल्या कित्येक नजरा
तरळले अश्रु तयांत
अन् कुठुनसा आला नवरा
ऊठ “हनी हनी “ म्हणत

लाखो नजरा रूष्ट जाहल्या
भानावर आल्या क्षणात
स्वप्नांवर त्यांच्या पडले पाणी
चरफडले फक्त मनांत !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२१-११-२०१७.


Sent from my iPhone

Saturday, June 1, 2019

विचारांचे प्रदूषण !


विचारांचे प्रदूषण 

प्रदूषण करते जग सर्व दूषित 
असो काहीही, स्वच्छ सुरक्षीत

अन्न असो की स्वच्छ हवा 
मिळताच त्यात भेसळ पहा
दूषित होऊन खराब होई
स्वत: बरोबर दुसऱ्यास खाई

अन्नाचे ही तसेच असते
भेसळ होता ते दूषित होते
भक्षण मग होता तयाचे
प्रकृतीस ही अपाय करते

शुद्ध हवेची तशीच खेळी
कारखाने, गाड्या धूर जाळी
प्राणवायू मध्ये मिसळून जाता
अशक्त हृदये करून सोडी 

पाण्याचे  ही जणू नसे वेगळे
दूषित रसायने त्यात मिसळता
आरोग्याची होते मग हालत
मात्रा औषधांची नाही चालत

विचारांचे तसेच भयंकर प्रदूषण
अविचार रूजती सदैव लवकर
संस्कृतींत ते घालती विरजण
सहीष्णूततेची करती बोळवण

त्याग, संयम, आपुलकी भावना
शांती, समाधान प्रदूषित बनवी
राग, मत्सर, दहशतवादी कामना
समाजात त्यांचे विषाणू पसरवी

पाणी, हवा, अन्नाचे प्रदूषण
आटोक्यात ही येईल कदाचित
परंतु विचारांचे तेच प्रदूषण
समाजा सह देशासही घातक !!

प्रदूषण करते जग सर्व दूषित 
असो काहीही, स्वच्छ सुरक्षीत

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२४-१०-२०१६.













Sent from my iPhone

आशा !

आशा  

पाऊस असतां, का लाजत एकटीच तू उभी
चिंब चिंब जलधारांनी भिजव आपली छबी

चंद्र कशास हवा, अनाहुत भासे तो आकाशी
चम चमता असतां, हसरा मुखडा तुज पाशी

हिरे मोती, मूल्यवान जरी दु:ख सदा दावीती
टप टप आसवं लोचनांत मोत्या सम भासती

ओठ डाळींबी कमल कळी, वापर कर तयांचा
बोलत बोलत हसत रहा, दर्शव गाल खळीचा

ऊन्हे परतती, वाट पाहती, दररोज ती बापडी
धावत धावत, ये आगाशीत कर बहाणे थोडी

नकोच पडू प्रेमात, नाही कुठली ही अपेक्षा
हातात हात मैत्रीचा, द्यावास ही मात्र आशा !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१३-१०-२०१६ ..


बशीर बद्र यांचे एका हिंन्दी गजलेवर आधारीत !


Sent from my iPhone

प्रीतीत मी गुंतलो ग सखे !!


प्रीतीत मी गुंतलो ग सखे !!

प्रीतीत मी गुंतलो ग सखे, बघ स्वप्नी तूच वसे
धु्ंद, बघ करणार तुला, वृंद माझ्या स्वप्नांतला

प्रेमाच्या रंगाने बहरली, बघ बकुळीची बाग ही
मुग्ध, बघ करणार तुला, गंध माझ्या मनातला

रंग गोजीरे लेवूनी सजली, बघ सृष्टी छान किती
दिप्त, बघ करणार तुला, रंग माझ्या स्वप्नांतला

एक रूप झालो कसे, बघ जुळले हे विचार जसे
गुंग, बघ करणार तुला, बंध माझ्या मिलनातला 

सूर ताल सजले ग कसे, बघ छेडून हृदयास ह्या
दंग, बघ करणार तुला, छंद माझ्या सूरांतला

प्रशांत कदम, 
९५९४५७२५५५
१०-१०-२०१६.







Sent from my iPhone

नको धरू अबोला !


नको धरू अबोला !!

बोलना हे सखे तू , नको धरू अबोला
ह्रदय माझे जाळीतो, सोड हा अबोला

तुझ्या समेत बोलतां, मज येतो उम्हाळा
वाटते नच सरावा, हा प्रेमातला उम्हाळा 

अगा प्रेम माझे, सांग येईल ना फळाला 
लागू नये वाटते, नजर कुणाची फळाला 

असो कधी कुठे ही, कोणता ही सोहळा
रात्रंदिन स्वप्नी सजे, मिलनाचा सोहळा 

प्रयत्न ही संपले अन् , धीर ही गळाला
लागेल सांग केंव्हा, मत्स्य ह्या गळाला

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
०३-१०-२०१७.















Sent from my iPhone

तूज शिवाय कोण मला !


तूज शिवाय कोण मला !

लाख वेळा सांगूनही 
का अशी तू वागते ?
झाल्यावर वाद आपले
मनास माझ्या लागते

दर्शवू नको चुका
एव्हढे तरी एैक तू
तोल माझा सुटतो
का नाही समजत तू ?

गुण चांगले नाहीत कदाचित
अवगुणही नाहीत मला
जसा आहे तो तूझाच
का कळत नाही तूला ?

गुण माझे वर्णू नको पण
सतत चुका दर्शवू नको
माफक अपेक्षा एक माझी
बाकी काही देऊ नको

दाखवील्या सतत चुका
तर मानहानी वाटते
असेलही ते कदाचित
माझ्या वाढत्या वय परत्वे 

खास विनंती माझी तूला
समजून घे तूच मला
शुल्लक चुका सोड तू
तूज शिवाय कोण मला ?

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२४-०८-२०१६.






Sent from my iPhone

नाव सजव !


नाव सजव,

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा नाव सजव

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा  नाव सजव

नाव सजवू नी शिडं ओढू
दर्याला आपल्या नारल देऊ
किरपा दर्याची घेऊन भाळी
नाव आणूया दर्या पाशी

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा  नाव सजव

एकवीरा आईला नवस बोलू
प्रसादीला तिला कोंबडं देवू
किरपा घेवून तिची डोईवरी
डोलकर जांतील दर्या मंदी

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा नाव सजव

नाव नेवूया समिंद्रा मधी
जाल घालूया मंधोमदी
एकवीरा आईच नाव मनी
म्हावरं गावंल जाल्या मंदी

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा  नाव सजव

नाखवा वल्हव रे नाव तूझी
सजलीया जनू ती रानी परी
आठव घरची देईल तूला
सुखरूप आणील किनारीला

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा नाव सजव

नारली पुनव आयली 
नारली पुनव,
दर्याच्या राजा नाव सजव !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
१४-०८-२०१६.





Sent from my iPhone

तेच ते , हे सखे !


तेच ते , हे सखे 
सांग ना , काय ते
लोचने ही तूझी
पाणावली 
का ? कशी ?

सांग ना 
काय झाले ?
नाही कळले
मला कसे ?

काय ? केंव्हा ?
घडले असे जे
हृदयास तुझ्या
अती लागले 

चूक माझी
मानतो मी
चुकुनी जरी
तुला दुखावले

सहन मला 
होतं नाही 
डोळ्यातील 
तुझी आसवे !

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२१-०८-२०१६.



Sent from my iPhone

गजानना श्री गणराया !!


गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया

मंगलमय रूप तुझे हे सुंदर
गळ्यात कंठीभाळी शेंदूर
कटी पितांबरहाती मोदक
एकदंत तू , लंबोदर मोहक
देवाएकदंत तू लंबोदर मोहक !!

गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया

जास्वंदीची तव फुले वाहतो
दुर्वांकुराचा हार घालतो
करतो तूझी पुजा विधीवत
तुजला आमचा दंडवत
देवातुजला आमचा दंडवत !!

गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया

विराजमान तू या मुषकावर
हिरे जडीत मुकुट शिरावर
अलंकार ते अमुल्य कानन
प्रसन्न करते नुसते दर्शन
देवाप्रसन्न करते नुसते दर्शन

गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया

तूला पाहता दुःख ही सरले
आनंदाला अती उधाण आले
कृपा तूझी रहावी आम्हावरी
हिच प्रार्थना करतो खरोखरी
देवाप्रार्थना करतो खरोखरी !!

गजानना श्री गणराया
वंदन करितो तुज मोरया

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
१८-०८-२०१६.













Sent from my iPhone

मुलगी शिकली !

मुलगी शिकली,

मुलगी शिकलीप्रगती झाली
साक्षीसिंधूनेशान राखली
एक नवा किर्तीमान रचला
आॅलिंपिक मध्ये झेंडा रोवला
प्रयत्नमेहनत कामी आली
मेडल मिळण्यास सुरूवात झाली
आले ब्राॅन्झमिळवले सिल्व्हर
गोल्ड ही मिळवतील मुली लवकर
भारताचे नाव मुलींनी ऊंचवले
अशक्य नाही हेच शिकवले
मुलींना कमी नकाच लेखू
त्यांचे कडून सर्व जिद्द शिकू
कन्या आहेत सबला आपल्या
शोभा नसून विरांगना भासल्या
मुलगी शिकलीप्रगती झाली
साक्षीसिंधूने , शान राखली

प्रशांत कदम,
२०-०८-२०१६,
९५९४५७२५५५.







Sent from my iPhone

तो स्वच्छ‌ंदी काळ !


एक काळ होता असा
कळायचे नाही 
दिवस संपायचा कसा

रात्र देखील तशीच असायची
बिछान्यात पडल्या पडल्या
झोप यायची

दिवसभर फक्त दंगा मस्ती
काळजी डोक्यावर
कसली नव्हती

छान स्वच्छंदी जीवन असायचे
खायचे खेळायचे
मस्त रहायचे

आता मात्र विपरीत घडले
ताण तणावांनी
मनाला घेरले

रात्र रात्र जागा राहतो
स्वास्थ्या साठी
औषधे घेतो

कामाचाही वाढलाय व्याप
कळत नाही
आशिर्वाद की शाप

होत नाही हिंडणे फिरणे
मौज मजा
मित्र भेटणे

कधि कधि मन हेलावते
उर्वरीत आयुष्याची
चिंता भासते

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.
२१-०८-२०१६














Sent from my iPhone

विश्वास !


विश्वास,

तूझ्याशी माझे, तसे वागणे
थोडे जरा, माझेच चुकले
तूलाच काय, काही क्षणांत
माझे मलाच, पूर्ण खटकले

मनांत अगदी, काही नव्हते
अनाहूतपणे अनावश्यक घडले
बोलण्याच्या, माझ्या नादात
अहंकाराने मला, होते घेरले

स्वत:स आवर, नाही घातला
चूक अकस्मात करून बसलो
तूला नाहक, करून दुःखी
आतताईपणात, पूरता फसलो

प्रामाणिकपणे कबूल करतो
चूकीची ही, मागतो माफी
अबोला तुझा नाही सोसवत
तूझ्या शिवाय, नाही करमत 

तुलाच आहे माझी विनवणी
माफ करून, मन मोठे कर
तूझ्या शिवाय कोण मला
विचार कर, तूच खरोखर 

चुकणार नाही पुन्हा कदापी 
याची तूला, देतो खात्री
चांगला वागेन, सदासर्वदा
विश्वास ठेव, माझ्या वरती

प्रशांत कदम,
२७ - ०१ - २०१७.
९५९४५७२५५५.










Sent from my iPhone