Friday, May 31, 2019

सवय एव्हढी लागली आहे !


सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही

आता ह्या मूलांचच बघा
दिवसभर धांगड धिंगा 
अभ्यासाच नाव नाही
मोबाईल अन् टिव्हि  पुढे
दुसरे नाही दिसत काही
फेसबूक अन् व्हाट्सअप सतत
मग तहानभूकही नाही लागत
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही


आई बाबांचा वेगळाच तोरा
माझंच खर हा एकच होरा
घरात आॅफिसात कामात गर्क
तरी फावल्या वेळात तर्कवितर्क
समंजसपणाचे दोघांनाही वावगे
सतत वादविवादाचा फड रंगे
नेहमीच्या अश्या भांडणां पाई
वातावरण मात्र बिघडून जाई
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही

आजी आजोबांचे वेगळेच वागणे
सतत शरीराचे नविन दुखणे
रोज स्वास्थ्याच्या नव्या कुरबूरी
तरी मनात मात्र विठ्ठल हरी
खायचे नाही औषध कुठलेही
डाॅक्टर कडे ही जायचे नाही
मुले नातवंडात रममाण व्हायचे
स्वताकडे मात्र दुर्लक्ष करायचे
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही


शेजाऱ्यांचा एक वेगळाच धर्म
सतत फुकटचा सल्ला हेच कर्म
चांभार चौकश्या करती सर्व
नेमके पकडती दूसर्ऱ्यांचे वर्म
अडीअडचणीत उपयोगी तरी
साखरदह्यासाठी येती घरी
ह्यांनाच जगाची सर्व माहीती
आपलीच सर्वांना सांगती महती
सवय एव्हढी लागली आहे
सांगून सूद्धा एेकायच नाही !!

प्रशांत  कदम,
९५९४५७२५५५
२७-०३-२०१४.






Sent from my iPhone

सूर असे जुळू दे

सूर से जुळू दे
गीत माझे फुलू दे
हृदयातील भाव माझ्या
तुझ्या अंतरी घूमू दे

तव प्रितीचे अविरत
दिवा स्वप्न पाहिले 
मनोमनी सदैव तूला 
आपले मी मानले

आज पूर्ण कामना 
होईल असे भासले
होता दर्शन अचानक
खास असे वाटले

नजरेत सहज तुझ्या 
अनुकंपा मी जाणली
सजग ती संवेदना
मला नकळत समजली

रोख तुझ्या भावनांचा
अलुवार मी जाणला
गंध तुझ्या श्वासातला
मला क्षणांत भावला

स्वर सूर आपले
एकसूरी ते जाहले
स्वप्नातील गीत आज
शब्दांत हळूवार गुंफले

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
--२०१६.


Sent from my iPhone

पोरग बिचारं माझं !

पोरग बिचारं माझं

कळत नाही पुढे 
व्हायचं हीच कसं
पोरग बिचारं माझं
साधं आहे तसं

छक्के पंजे कसले
नाही समजत काही
निरागसता तिच्यातली
कधिच संपत नाही

राग मात्र तिचा
नाका वरच असतो
क्षणो क्षणी पारा
वर वरच चढतो 

मना विरूध्द घडलेले
होतं नाही सहन
मनांत सतत तिच्या
प्रश्न पडतात गहन 

अल्लडता तर तिची
पहात रहावीशी वाटते
फुलपाखरा समान
भिरभीरत ती असते

गमतीत तिची कधि
घेतली जरी फिरकी
काहीच कळत नाही 
धुंदकीतच घेते गिरकी

रागावली रूसली तरी
होते क्षणार्धात शांत
निर्मळ प्रसन्न मनाने
ती रमते आनंदात 

प्रेम व्यक्त करण्याची
तिची पद्धतच वेगळी
लाडात येउन भांडण्यात 
ताकद लावते सगळी

कळत नाही पुढे 
व्हायचं हीच कसं
पोरग बिचारं माझं
साधं आहे तसं !!


प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
१२-०२-२०१६.









Sent from my iPhone

सलाम

      सलाम

सलाम आमचा जवानांना
त्रिवार मुजरा शूर वीरांना
मातृभूमी अन् देशासाठी 
अमर होणाऱ्या त्या वीरांना !!

कर्तव्य दक्ष सदैव असती
दिवस असो की रात्र असो
तमा नसे त्यांस अन्नपाण्याची
मग थंडी असो की पाऊस असो !!

होऊन उदार जीवा वरती
प्राण पणाने लढती सारे
शत्रूंचा पूर्ण बिमोड करण्या
पेटून उठती जवान सारे !!


गृहसौख्य ही विसरूनी जाती
आक्रमण होता शत्रूचे 
प्राण निछावर करती आपुले
संरक्षण करण्या देशाचे 

परमवीर हे जवान आमचे
भूषण भारत देशाचे
आदर,अभिमान खास असे
कारण आहेत आमच्या देशाचे !!

सलाम आमचा जवानांना
त्रिवार मुजरा शूर वीरांना
मातृभूमी अन् देशासाठी 
अमर होणाऱ्या त्या वीरांना !!

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५
११-०२-२०१६.












Sent from my iPhone

ऊदे ,ऊदे , ऊदे

ऊदे ,ऊदे , ऊदे 
ऊदे  अंबा बाई
आई भवानी तूझ्याच साठी
आलो तूझीया दारी
घेऊनी आलो तूझ्याच साठी
चार पायांचा बळी
ऊदेऊदेऊदे
ऊदे  अंबा बाई

आई भवानी तूझ्याच साठी
मांड मांडीला घरी
घेऊनी आलो तूझ्याच साठी
ओटी साडी चोळी
ऊदेऊदेऊदे
ऊदे  अंबा बाई

आई भवानी तूझ्याच साठी
चूल सजवली नवी
घेऊनी आलो तूझ्याच साठी 
प्रसाद तक्षण करूनी
ऊदेऊदेऊदे
ऊदे  अंबा बाई

आई भवानी तूझ्याच साठी
दिवट्या अन् मशाली
घेऊन आलो तूझ्याच  साठी
पिंजर गुलाल भाळी
ऊदेऊदेऊदे
ऊदे  अंबा बाई

आई भवानी तूझ्याच साठी
जागर जागविला
घेऊनी आलो तूझ्याच साठी 
गोंधळी अन् वाजंत्री
ऊदेऊदेऊदे
ऊदे  अंबा बाई

आई भवानी तूझ्याच साठी
गोंधळ हा घातला
आशिर्वाद दे आमच्या साठी
ऐश्वर्य सूखाचा
ऊदेऊदेऊदे
ऊदे  अंबा बाई
ऊदे  अंबा बाई !!

प्रशांत कदम
९५९४५७२५५५.
२५-०४-२०१४,









Sent from my iPhone

नाही ऊमगले कधी


नाही ऊमगले कधी



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

गोड हसण्यावरी हा कधी भाळला



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

गोड हसण्यावरी हा कधी भाळला

हासरी लाजरी स्वप्नी दिसशी मला

गंध श्वासातला ह्रदयी मिसळला



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

रेखीव रूपावरी सहजच सूखावला

गुलाब पुष्प जणू लागले दिसायला

आसमंतातही मंद सुगंध दरवळला



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

लाघवी शब्दांमधे अपसूकच थांबला

अवखळ स्वर हे तूझे मोहवी मनाला

एकरूप होउनी नादब्रम्हच गरजला



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

स्नेह आपुला कसा साधला वाढला

साद मी घातली प्रतिसाद लाभला

प्रितीचा छंद हा मोहरला बहरला



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

सहवास तूझा हवा हवासा वाटला

स्वप्नातही विरह नकोसा जाहला

बेचैन रात्रीं मधे जीव हा तळमळला



नाही ऊमगले कधी जीव हा गूंतला

गोड हसण्यावरी हा कधी भाळला



प्रशांत कदम

२० - ०६ - २०१४.

९५९४५७२५५५,



Sent from my iPhone
Show quoted text

आईची रजा

आईची रजा

का ? आमच्या आईला मिळत नाही रजा
सर्व जण रविवारी घेतात, सुट्टीची मजा !

घरात कामे उरकून, आॅफिसला ती जाते
आॅफिसात ही ती, घरची काळजी करते

आॅफिसमधील कामात, आहे ती तरबेज
बेस्ट एम्प्लाॅई अॅवाॅर्ड, मिळवते आॅलवेज

सगळी कामे तत्परतेने, करते फटदीशी
आस्थेने सर्वांची, नेहमीच करते चौकशी

संध्याकाळी थकून भागून, घरात ती येते
जरा ऊसंत न घेतां, कामास पुन्हा लागते

घर आवरून, सुग्रास जेवण तिच बनवते
कुटुंबाच्या आरोग्याची, काळजी ही घेते

मुलां पासून बाबांपर्यत, सर्वांची लाडकी
हट्ट पुरविते सगळ्यांचे, आहेच हक्काची

निखळ प्रेम कुटुंबावर, छाया देते प्रेमाची
रागावली जर कधि, असते माया ममतेची

सगे सोयरे शेजाऱ्यांशी, संवाद ती साधते
सासर माहेर यांच्यातही, समन्वयच पाहते

सदानकदा हसत खेळत, उत्साही असते
गप्पा गोष्टी करता करता, कामे आटपते

कळत नाही कुठून, एव्हढी एनर्जी आणते ?
आमच्या मनातलं ही, कसं काय जाणते ?

सकाळ ते झोपेपर्यंत, नेहमीची पळापळ
दुसऱ्या दिवशी पुन्हा, तिची सूरू धावपळ

कळत नाही का ? आईला मिळत नाही रजा
सर्व किमान घेतात, रविवारी सुट्टीची मजा !

रविवारी तर होते तिची, अधिकच दगदग
खमंग जेवणा साठी,चालू असते लगबग !

प्रशांत कदम ,
९५९४५७२५५५,
०९-०२-२०१७.



Sent from my iPhone

हे मेघांनो दूर व्हा !

हे मेघांनो दूर व्हा

हे मेघांनो दूर व्हा
पूर्ण चंद्र दाखवा जगा
पौर्णिमेची ही रात्र आज
गगनास असो चंदेरी साज
नको झाकाळू चंद्र तरंग
खुलु दे गगनी ताऱ्यांची बाग
नको लपंडाव रोज रोज
लखलखू दे अहोरात्र तेज
नीरव शांत तव आकाशात
बहरू देत ग्रह ताऱ्यांची प्रित
पाहू देत सृष्टीस सहज
चंद्र किरणांची तीव्र गजबज
पौर्णिमेच्या शुभ्र लहरी
झळकू दे रात्र प्रहरी
गडद झालर दूर सारूनी
आनंदमय होऊ दे रजनी
हे मेघांनो दूर व्हा
पूर्ण चंद्र दाखवा जगा
पौर्णिमेची ही रात्र आज
गगनास असो चंदेरी साज !!

प्रशांत कदम, 
०२-०८-२०१७.
९५९४५७२५५५.




  


Sent from my iPhone

कवीता

कवीता 

कवीता म्हणजे दुसरे काय 
कवी मनावरली तरल साय

मंतरलेल्या त्या भाव भावना
सहजच सुचलेल्या कल्पना

वृद्धींगत करी मनी ऊत्कंठता
हळुवार साकारती प्रगल्भता

देत असे जीवनालाच उर्जा
वाढवून समाजातील दर्जा

तोडून सामाजिक बंधनाना
जागवती नवोदित संकल्पना

कवीता देत असे प्रेरणा
आमुलाग्र बदलवी आचरणा

प्रशांत कदम,
०३-०८-२०१७.
९५९४५७२५५५.


Sent from my iPhone

चल चल

चल चल 
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

दर रोज मला सध्या
आठवण तूझी येते
रात्र रात्र ती मला 
जागेच उगा ठेवते

काही सुचत नाही मला
जरा करमत नाही मना
आता कसे सावरू जीवा
सांग प्रिये तुझ्या वीना

माझ्या हृदयातील धड धड
बघ तुझाच जप करते

चल चल
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

काल स्वप्नात तू दिसलीस
काही बोलत तू होतीस
जणू मनातीलच माझ्या
तराणेच ऐकवत बसलीस

बिलगून मला कधी
कवेत तू घेशील
हे भास सांग कधी
खरे कसे होतील

मी विचार करत राहतो
अन् आठवण तुझी काढतो

चल चल
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

तूला वाटेल मी एवढे
का तुजवर प्रेम करतो
तू म्हणशील वेडा मला
मी तेही मान्य करतो

वेड्यांचे हे गुण सर्व
वेडेच तर जाणतील
मरण्यातली ती मजा
मजनू च समजू शकतील

तू अशीच भेटत रहा
स्वप्नातून सतत मला

चल चल
मीठीत माझ्या येना प्रिये
धड धड
ह्दयाची माझ्या ऐक साजणे

प्रशांत कदम,
०४-०८-२०१७,
९५९४५७२५५५.










Sent from my iPhone

ओ तेरी चांल याहूं याहूं ! ( हिंदी )

ओ तेरी चांल याहूं याहूं

ओ तेरी चाल यांहू यांहू
दिल में कर दे ईलू ईलू
दिल की धडकन यह बंद कर दे
तू जो मुढकेभी देखे तो
तिरछीं आखोंसे देखेतो
जान लाखोंकी तू ले ले 

तुझसा यहां कोई है नही
तुझसा हसीं कोई और नही
तू जो आए बहार लाए 
जवां दिलोंमे झंकार लाए

ओ तेरी चाल ...

तेरी अदा लाजवाब है 
तिखी मिठी तेरी बात है
गाली भी दे, तो क्या बात है
सब कुछ यहां तुजको माफ है

तजको गुस्सा भी जो आए
खुबसुरत और बनाए
तुजमें गुलाबी रंग भर दे

ओ तेरी चाल .....

मुझसे मिलने तो तू रूक जरा
दिल के करीब मेरे आ जरा
प्यार महोब्बत जता जरा
जवां दिलोंको जला जरा

तू जो मेरी बात माने
मेरे प्यार को जो तू जाने
अपने दिलसे मुझे लगालें
तो जान कुर्बांन तुजपे कर दूं

ओ तेरी चाल ......

प्रशांत कदम,
९५९४५७२५५५.



Sent from my iPhone