वृत्त - आनंद - गागालगा लगागा
मस्तीत येत जारे !!
नशिबात आपल्या रे
आनंद का नको रे
मस्तीत येत जारे
खेळू जमून सारे
दाटून मळभ आले
उघडेल पावसाने
सोडू नकोस आशा
दिसतील चंद्र तारे
दैवात माणसाच्या
येतात दुःख का रे
हसताच संगतीने
पळतील दूर ना रे
रिझतील सर्व श्रोते
अश्रूत डुंबणारे
गाणे असेच गावे
हो तृप्त ऐकणारे
वाईट आणि खोटी
संगत नको धरा रे
दुस-यांस देत जावे
जीवन असे जगा रे
प्रशांत कदम,
मुंबई
९५९४५७२५५५.
०९~१०~२०२२.