आनंदकंद वृत्त - गागाल गालगागा गागाल गालगागा
मी ही तयार आहे !!
धंदे बरेच केले, बसलो कधीच नाही
व्यापार खूप केला, चुकलो कधीच नाही
अनुभव चिकार आले, तावून मी निघालो
धक्केच घेत शिकलो, थकलो कधीच नाही
मदतीस येत होतो, कोणास ही कधीही
नाही कधी न म्हटले, दमलो कधीच नाही
शेतात काम केले, धरणीस मानले, नी
मातीत रंगलो मी, हरलो कधीच नाही
देशास पाहिजे ते, सैनिक तरूण उमदे
मी ही तयार होतो, हटलो कधीच नाही
प्रशांत कदम
०५~१०~२०२१.
९५९४५७२५५५.
Very meaningful & thoughtful poem.
ReplyDeleteवाह! छानच!!
ReplyDeleteVery nice 👌🙂👍
ReplyDeleteChaan 👍😊
ReplyDelete👍👍
ReplyDeleteThank you every one.
ReplyDelete