लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा
आनंदकंद वृत्त - तरही गझल () सागर निंबाळकर.
(मोजू नकोस लाटा येतात त्या निरंतर)
मोजू नकोस लाटा देतात तंत्र सुंदर
देतात त्या जगाला जगवीत मंत्र सुंदर
येतात वादळे ही जातात ती उडूनी
लाटाच परत करती फिरवीत मंत्र सुंदर
घेईल समुद्र पोटी देईल परत सारे
दावी अथांग प्रीती घडवीत मंत्र सुंदर
बघण्यास तू सखे ये लाटाच त्या किनारी
हसतात बघ कशा त्या जडवीत मंत्र सुंदर
म्हणतो प्रशांत लाटा आहेत प्रिय निरंतर
देतात स्वर जगाला ऐकवित मंत्र सुंदर
प्रशांत कदम,
१६~०९~२०२१
९५९४५७२५५५.
मस्त 👍 व्वा
ReplyDelete