Saturday, May 28, 2022

प्रशांत गझल - अक्रित



 8/8/6 - शुभगंगा 

अक्रित 

आज चांदणे ढगात लपले तुझ्या मुळे

शोधत प्रीती उनात हसले तुझ्या मुळे


तुला पाहता गोळा झाले नभात तारे 

अंबर सारे उत्तम सजले तुझ्या मुळे


मत्सरात त्या नाहक रुसल्या अप्सरा जणू 

नयन तयांचे नकळत भरले तुझ्या मुळे 


प्रफुल्लित कसे जग पण झाले पाहता तुला

कित्येकांचे जीवन रमले तुझ्या मुळे


सौंदर्यवती जरी साजणी साधी माझी

जीवनात ह्या अक्रित घडले तुझ्या मुळे


प्रशांत कदम, 

मुंबई, 

१४~०५~२०२२.

2 comments: