दु:ख आता फार झाले, तरही गझल ( नाव माहीत नाही )
वृत्त : मनोरमा - लगावली : गालगागा गालगागा
राम राज्य आज सरले !! ()
बंद आता दार झाले
(दुःख आता फार झाले)
काय सांगू आज साध्या
माणसांवर वार झाले
चूक ज्यांची मात्र नाही
तेच नाहक ठार झाले
आहुती ही आज घेता
राग अवघे गार झाले
राम राज्य आज सरले
हे कथेचे सार झाले
प्रशांत कदम,
मुंबई,
९५९४५७२५५५,
२६~०१~२०२२.
●
👌👌👍👌
ReplyDelete