गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद वृत्त
अर्थ जगण्याचा !!
भांडण उगाच करुनी, हसण्यात अर्थ नाही
त्रागा उगाच करुनी, जगण्यात अर्थ नाही
आयुष्य छान आहे, आनंद रोज घ्यावा
दिवसा गणीक तंटे, करण्यात अर्थ नाही
ध्येये समोर घ्यावी, श्रम ही तसे करावे
कामास देव माना, हरण्यात अर्थ नाही
येईल ते स्विकारा, अल्पात हर्ष माना
निष्क्रीय होत केवळ, बसण्यात अर्थ नाही
संतुष्ट हेच मोठे, औषध जगावयाचे
कार्यात मग्न व्हावे, रुसण्यात अर्थ नाही.
प्रशांत कदम,
९५९४५७२५५५,
२८~०१~२०२२.
●
No comments:
Post a Comment