गागालगा लगागा गागालगा लगागा - आनंदकंद
नादात पावसाच्या !!
मनसोक्त आज भिजलो पाण्यात पावसाच्या
झिंगून नाचलो मी तालात पावसाच्या
विसरून मात्र गेलो माझ्या वयास पुरता
दंगून गात बसलो नादात पावसाच्या
पाऊस आज टप टप बरसून काय आला
गुंतून खास गेलो थेंबांत पावसाच्या
विज बघ नभात चमके गालात लाजताना
रंगून चिंब झालो छंदात पावसाच्या
थंडी तशीच भरली येता तूफान मोठे
थिंबून पूर्ण गेलो कहरात पावसाच्या
प्रशांत कदम,
मुंबई,
१३~०७~२०२२.
खुप छान...👍👍👌👌
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteआनंदकंद (झिंगून, दंगुन, गुंतून, रंगून, थिंबुन) नादात पावसाच्या ...... सुंदर शब्दरचना
ReplyDeleteसुखकर अनुभव 👌
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDelete