Sunday, August 7, 2022

प्रशांत गझल - मित्र आम्ही !!

 


मित्र आम्ही !!


मैत्री निर्मळ करतो आम्ही

मैत्र भावना स्मरतो आम्ही 


आले मोठे अडथळे जरी

पुरून त्यांना उरतो आम्ही 


गलितगात्र जर मित्र भासले

ह्रदयी उर्मी भरतो आम्ही


आधार पुढे लगेच करुनी 

सावरण्या मग झटतो आम्ही 


रुसवे फुगवे दूर ठेवुनी 

मोदात सदा हसतो आम्ही


प्रशांत कदम, 

९५९४५७२५५५.

1 comment: