अभंग - भाव भोळा हरी । ( ६।६।६।४ )
भाव भोळा हरी । मनात असावा ।
स्वप्नात दिसावा । नित्य नेमे।
करा सदा भक्ती । पावेल तत्क्षणी ।
दिसे क्षणो क्षणी । आस पास ।
उपास तापास । करावे कशास।
असता जमेस। हरी भक्ती ।
जगावे निर्मळ । नसावी आसक्ती ।
नाही काही सक्ती । देवा ठायी ।
जगाच्या कल्याणी । राबतो अनंत।
खरा साधू संत । ओळखावा ।
करुनी अर्पण । जगी दान धर्म ।
करावे सत्कर्म । सदोदित ।
विठू रखुमाई । आमुची माऊली ।
मिळे ती सावली । चरणांशी।
प्रशांत कदम,
मुंबई,
९५९४५७२५५५.
सुंदर झालाय अभंग 🙏🙂👌👍
ReplyDelete